Breaking News

बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढुन तरूणींची फसवणूक

औरंगाबाद, दि. 22, ऑक्टोबर - औरंगाबादमध्ये बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढुन पसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडत असून आज दोन  तरूणींना ययाचा गंडा बसला दोघींची मिळून 50 हजार रुपयांची फसवणूक झाली असून या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. राहुल तेजराव गोराडे (29, रा. एन-9, सिडको) यांच्या बहिणीला 17 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अज्ञात क्रमांकावरुन कॉल आला. नोकरी  संदर्भात कॉल असून नोकरीचे आमिष दाखवत त्याने संकेतस्थळावर खाते उघडण्यासाठी एक मेसेज पाठवत आहे. त्यातील माहिती देण्यास सांगितले.  यावेळी आलेल्या संकेतस्थळावर शंभर रूपये शुल्क भरत असतानाच बँक खात्यातून अचानक ऑनलाईन व्यवहाराद्वारे पाच वेळेला 10 हजार रुपये कमी  झाल्याचा मेसेज आला. याप्रकरणी गोराडे यांच्या तक्रारीववरुन सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत  आहेत.अशीच घटना सिडकोत घडली आहे.