Breaking News

धर्मापुरीजवळ कार पलटी होऊन एकाचा मृत्यू, चार जखमी

बीड, दि. 22, ऑक्टोबर - परळी तालुक्यातील धर्मापुरीजवळ  स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर चार जण जखमी  झाले आहेत.
आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ते धर्मापुरीच्या सबस्टेशन जवळ कार पलटी होवून कारमधील हनुमंत वाल्मिक दहिफळे (वय 35) यांचा जागीच  मृत्यू झाला तर सिद्धेश्‍वर वैजनाथ दहिफळे (वय 40), विश्‍वनाथ व्यंकटी कांबळे (वय 35), गणपत उत्तम दराडे (वय 42) आणि योगेश वसंत दहिफळे (वय  26) हे गंभीर जखमी झाले. परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथे राहणारे हश पाच जण मुंबईहून माघारी गावाकडे येत होते. चालकाचा कारवरील ताबा  सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात अपघाताची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते संजय दौंड आणि सामाजिक युवा कार्यकर्ते महावीर फड यांनी  तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यापैकी दोघांना पुढील  उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे., मयत हनुमंत वाल्मिक दहिफळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तहसीलला गोडाऊन किपर पदावर  कार्यरत होते.