Breaking News

वांझोट्या शिवद्रोही विचारांनी बहुजन महाराष्ट्राला महाराज शिकवू नयेत......

दि. 24, ऑक्टोबर - काही माणसं जात्याच निर्लज्ज असतात.त्यातही सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या उच्च पदस्थ व्यक्तीमत्वाने सामाजिक भान गुंडाळून असा निर्लज्ज पणा  दाखवला तर त्यांना पढत मुर्ख म्हणण्याचा रिवाज आपल्याकडे आहे.अशाच काही पढत मुर्खांनी आपला समाज भोळा आहे,तितकाच मुर्ख आहे अशी मनाची समजूत घालूनआपली  विद्वत्ता पाजळण्याचा धंदा सुरू केला आहे. आपणच तेव्हढे शहाणे,बाकीच्यांची अकलेशी आजीवन फारकत झाली आहे या अविर्भात वावरणारे कथित बोरू बहाद्दर समाजावर काही  आपले बुड नसलेले तत्वज्ञान लादण्याचा प्रमाद करीत आहेत. गेल्या दोन रवीवार पासून या प्रवृत्तीची पिलावळ महाराष्ट्रात पुन्हा सक्रीय झाली असून महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या  खांद्यावर बंदूक ठेवून आपले सावज हेरण्याचा कुटील प्रयत्न करू लागली आहे. राजकारणात आधी शिव छञपतींच्या नावाचा वापर करून महाराष्ट्राच्या जनतेची भुलथापा देऊन मने  जिंकून घेतली.छञपतींच्या सर्वधर्मीय मावळ्यांना नादाला लावून त्यांचे तारूण्य वापरले,स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली.
बहूजन मावळ्यांच्या रक्तावर रेघोट्या ओढून राजकीय सामाजिक आणि आर्थिक साम्राज्य उभे केले.आणि ढेकर देऊन ढेरीवर हात फिरवण्या इतपत परिस्थिती निर्माण झाल्या नंतर  त्या मावळ्यांना तर लाथाडलेच पण छञपतींच्या बदनामीची मोहीम उघडणार्या शेंडफळ्या पिलावळीला डोक्यावर घेऊन नाचायला सुरूवात केली.
मागच्या रवीवारी अशीच मुक्ताफळे उधळण्याच्या नादात छञपती शिवाजी महाराज आणि शिव पुञ युवराज संभाजी महाराज यांचा अवमानकारक एकेरी उल्लेख करून युवराजांना हुड  संबोधले.मावळ्यांमध्ये त्या लिखानाविरूध्द प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते.या कथित विद्वत्तेगीरीचे पुतळे जाळणारा उद्रेक पाहील्यानंतर बुडाखालची जमीन दुभंगू लागल्याने या  रवीवारी उपरती होऊन तो रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.
अर्थात ती केवळ मखलाशी आहे.उपरती झाल्यानंतरही तोच अहंकार शब्दाशब्दातून जाणवतो आहे.हे विद्वान अजूनही चुक मान्य करण्याची तयारी दाखवत नाहीत.या पुर्वीही मुका  मोर्चा वरून उठलेल्या वादळाच्या भावना अशाच पायदळी तुडविल्या,यावेळीही महापुरूषांची बदनामी केल्यानंतर माफी मागण्या ऐवजी उसळलेल्या भावनांना तत्वज्ञानाचे डोस  पाजण्याची आततायी खेळी खेळली जात आहे.हे महाशय उलटपक्षी महाराज आणि युवराज समाजाला समजले नाहीत,समाजाला इतिहासाचे भान नाही,दैवतांना एकेरी संबोधन्याची  प्रथा आहे,इतिहास कुणाच्या मालकीचा नसतो,अशाने महाराजांचा महाराष्ट्र दुभंगला जाईल.असे तारे तोडून आपण रास्त होतो आणि आहोत हे समाज मनावर ठसविण्याचा प्रयत्न करू  पहात आहेत. याच लेखात या महाशयांनी युवराज यांना उद्देशून हुड
हा शब्द रांगडेपणा या अर्थाने वापरला असल्याचा युक्तीवाद केला आहे.खरेतर या मराठी विश्‍व पंडीतांनी हुड म्हणजे रांगडा असा नवा अर्थ  शोधून रोखठोक जावई शोध लावला  आहे.म्हणे महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाने उच्छाद मांडला आहे,पण या जातीय वादाची शेंडी कुठून प्रवाहीत होते याचे उत्तर या महाशयांनी द्यायाला हवे.दैवत म्हणून  महाराज,युवराजांना एकेरी संबोधले तर बिघडले कुठे हा युक्तीवाद करण्यापुर्वी क्षणभर आपण ज्यांना दैवत मानतो,त्या साहेबांचाही असा एकेरी उल्लेख मान्य कराल का? या प्रश्‍नाचेही  उत्तर त्यांनी देणे अपेक्षित आहे.छञपतींची बदनामी करणारा जेम्स लेन,त्याला खोटी माहीती पुरवणारी भांडारकर पुरंदरेंच्या पिलावळीची भलावण आणि उदात्तीकरण करणार्या  वांझोट्या आणि शिवद्रोही विचारांनी बहुजन महाराष्ट्राला महाराज शिकवावेत,समजून सांगावेत एव्हढे वैचारिक दारिद्र अजून आले नाही.
आज हे महाशय ज्या ताटात जेवण करतात ते ताट बहूजनांच्या त्यागाने भरले आहे,विशेषतः बहूजन तरूणाईच्या त्यागाने ओसंडून वाहते आहे.त्या त्यागाला अशा पध्दतीने अवमानीत  करीत असाल तर सुरू असलेल्या दुकानाला ताळा लावण्यासाठी कुठला मुहूर्त शोधण्याची वाट पहावी लागणार नाही.