Breaking News

सिव्हिल’च्या नव्या इमारतीस फुटली हिरवळ

सोलापूर, दि. 24, ऑक्टोबर - सिव्हिल हॉस्पिटलमधील नवी इमारत बी ब्लॉकला हिरवळ फुटली आहे. त्याच्या भिंतींवर पिंपळ, कडूननिंबसारखी झाडे उगवली आहेत. त्यांच्या  मुळांमुळे इमारतीला तडा जाण्याची धोका आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वारंवार पत्र पाठवूनही बांधकाम विभाग गांभीर्याने घेत  नसल्याचे दिसते. त्यांचे हे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर बेतणारे आहे. बी ब्लॉक 10 वर्षांपूर्वी बांधला. ती 2010 पासून वापरली जात आहे. येथे सर्वच विभाग कार्यरत आहेत. मेडिसीन  मानसशस्त्र विभाग स्कीन हे ब्लॉक मध्ये आहेत. सर्जरी, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र विभाग, रेडीओलॉजी, पॅथॉलॉजी आदी विभाग बी ब्लॉकमध्ये कार्यरत आहेत. या  विभागातही कमालीच्या समस्या आहेत. ड्रेनेज तुंबलेले, फरशा तुटलेल्या, शस्त्रक्रिया विभागातील दरवाजे, वीजपुरवठा बल्ब नाहीत. मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या समवेत बैठक  झाली होती. त्यावेळी महिन्याभरात कामास सुरुवात केली जाईल, असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतेच काम झालेले नाही. बालरुग्ण ओपीडीच्या वरच्या मजल्यावरील वॉश बे सिनचे पाणी थेट ऑर्थो विभागाच्या ओपीडीमध्ये येते. त्याची दुरुस्ती केलेली नाही. ऑपरेशन थिएटरचे दरवाजे खराब आहेत. फरशा फुटल्या आहेत. वीजपुरवठा नीट होत नाही. क ाही ठिकाणी दिवे नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना समस्या निर्माण होतात. काही डॉक्टर स्वत:च्या खिशातून बल्ब विकत आणून ऑपरेशन थिएटरमध्ये लावतात.  लेबर ओटीमध्ये शस्त्रक्रिया करणेच शक्य नव्हते. तरी त्या ठिकाणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या सहकार्याने समस्या तात्पुरत्या दूर केल्या केल्या आहेत.