Breaking News

मृतक आरोग्य सहायक प्रकाश अंभोरे यांच्या कुटूंबियांना विमा दाव्याची रक्कम प्रदान

बुलडाणा, दि. 11, ऑक्टोबर - जिल्हा हिवताप कार्यालयाच्या आस्थापनेवर प्राथमिक आरोग्य केंद्र, जलंब येथे आरोग्य सहायक पदावर क ार्यरत असलेले प्रकाश अंभोरे यांचा 15 एप्रिल 2017 रोजी नांदुरा येथे जात असताना अपघाती मृत्यू झाला. राज्य शासकीय कर्मचारी  समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत मृतक प्रकाश अंभोरे यांच्या कुटूंबियांना विमा दाव्याचे 10 लक्ष रूपयांच्या धनादेशाचे वितरण नुक तेच जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी चव्हाण आदी उपस्थित होते. राज्य शासनाने  अपघात विमा योजनेतंर्गत शासकीय अधिकारी/कर्मचार्‍यास अपघाती मृत्यू अथवा कायम अपंगत्व आल्यास, सदर कर्मचार्‍यास अथवा  त्याच्या नामनिर्देशीत वारसांना आर्थिक स्वरूपात  नुकसान भरपाई देण्यासाठी अत्यंत माफक वर्गणीमध्ये विमा संरक्षण देण्यात येते. ही  योजना यशस्वीपणे रूजविण्यासाठी, कर्मचारी व त्यांच्या वारसांचे हित संवर्धनाकरीता शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी जि.प अध्यक्षा  श्रीमती तायडे यांनी सांगितले.  याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.