Breaking News

वेणी ग्रामपंचायतीवर दुसर्‍यांदा भगवा

बुलडाणा, दि. 11, ऑक्टोबर - तालुक्यातील वेणी ग्रामपंचायत सरपंचपदी अभिमन्यू साखरे यांची थेट जनतेतून निवड झाली आहे. मागील  2012 साली जनतेने अभिमन्यु साखरे यांना सरपंच पदी अविरोध निवडून देऊन विकास कामाची संधी दिली होती. त्या जनतेने दिलेल्या  संधीचे सोने करून घेण्यासाठी विकास कामाचा धूम धडाका लावत गावात माजी पं. समिती सदस्य मनोज तांबिले यांच्या मार्गदर्शनाखाली  विकास कामे करून गावकर्‍यांची मने जिंकली आहे. 
यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेतरस्ते, विविध योजनेंतर्गत घरकुले, या सारख्या योजना राबवून विकास कामे केली. त्याचेच फलित  म्हणजे थेट जनतेतून दुसर्यांदा सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. याच विकास कामामुळे प्रभाग क्र. 1 मधून विष्णु पुंजाजी  जावळे, विमल परसराम गायकवाड, सिंधू जनार्धन काकडे, तर प्रभाग क्र. 2 मधून महादेव जयराम औदगे, इंदू भागवत अंभोरे तसेच प्रभाग  क्र. 3 मधून गजानन उद्धव वाघमारे, कैलास भोजेराव घायवट, नयना राधेश्याम कटारे, आणि प्रभाग क्र. 4 मधून त्र्यंबक गणपत जावळे,  शेख नाजीराबी शेख इसाक यांना सुद्धा जनतेने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून दिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी गावातील माणिकराव जावळे, प्रल्हाद देवकर,  प्रताप देशमुख, नारायण देशमुख, केशव साखरे, विठठल पांडुरंग साखरे, कैलास गावंडे, बंडू अग्रवाल, देविदास कळणू जाधव, शेख रफिक,  अशोक हारदाळकर, शेख सर, महादेव गावंडे, गजानन काकडे, मछिंद्र काकडे, बाबुराव जाधव, शेख जमीरभाई, उत्तम मोरे, अशोक क ाळेगावकर, गजानन अंभोरे या शिवसैनिकांनी कसोशीने प्रयत्न करून अखेर निवडणुकीत ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकविला  आहे.