Breaking News

नदी प्रदूषण रोखणा-या संस्थांचा अंनिसतर्फे सन्मान

पुणे, दि. 02, ऑस्टोबर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने गणेशोत्सवामध्ये गणपतिदान व निर्माल्यदान उपक्रम राबवून पवना  नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या व अभिनेत्री संध्या गोखले यांच्या हस्ते पर्यावरण रक्षक पुरस्कार देऊन संस्कार प्रतिष्ठानला गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीने  उपाध्यक्षा रंजना जोशी, अनिल माने, विजय कुलकर्णी, संदीप रांगोळे, मिलन गायकवाड, सागर अडसूळ यांनी स्वीकारला.
संस्कार महिला बचत गट चिंचवडेनगर यांनी निर्माल्यदान उपक्रमात चांगली मदत केल्याबद्दल त्यांनाही पर्यावरण रक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा  पुरस्कार बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी स्वीकारला.