Breaking News

महाआरोग्य अभियान नोडल अधिकारी डॉ. अशरद खान यांची तालुक्यांत पाहणी

जळगाव, दि. 02, ऑस्टोबर - रावेर येथे महा आरोग्य अभियान अंतर्गत आयोजित तपासणी मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रचे नोडल अधिकारी डॉ अशरद खान यांनी  रावेर, यावल, मुक्ताई नगर, चोपडा भागात प्रत्यक्ष जाऊन सरकारी दवाखाने आणि खाजगी दवाखाने येथे पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत जिल्हा शल्य  चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण हेदेखील उपस्थित होते. रावेर येथे रुग्ण कल्याण समितीचे पद्माकर महाजन, तहसीलदार विजय ढगे, डॉ संदीप पाटील, डॉ बी बी  बारेला आदी उपस्थित होते.