Breaking News

पुण्यात कृत्रिम पाय बसवण्यासाठी शिबीराचे आयोजन

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - रोटरी क्लब पुणे मगरपट्टा सिटी आणि नोबल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पाय बसवण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर  शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत नोबल ह़ॉस्पीटल, मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे येथे होणार आहे. याकरिता नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे  अध्यक्ष रो. सूर्यकांत चौधरी यांनी सांगितले. शिबीरात सहभागी होण्याकरिता 9423004886 संजीवनी बगाडे यांना संपर्क करण्याचे आवाहन सचिव रो.जी. एस. सलूजा यांनी केले  आहे.