Breaking News

विजेचा झटका बसून आई-मुलाचा मृत्यू

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - गोरेगावमधील बिंबिसार नगर येथील म्हाडा वसाहतीत विजेचा झटका बसून आई आणि तिच्या दोन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. प्रियंका असे मृत महिलेचे  नाव आहे. या घटनेनंतर प्रियंका आणि तिचा मुलगा प्रिन्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रियंका ही प्रिन्सला स्तनपान करण्यासाठी खिडकीत बसली होती. यावेळी लोखंडी ग्रीलला तिचा हात लागला. दिवाळीच्या माळांची एक वायर ग्रीलच्या संपर्कात आल्यामुळे या दोघांना  विजेचा झटका बसला. प्रियंका ही पती, सहा वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा प्रिन्स यांच्याबरोबर राहत होती. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या  घटनेसाठी कोणालाही जबाबदार ठरवता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.