Breaking News

विद्युततारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान

जालना, दि. 22, ऑक्टोबर - शेतातुन गेलेल्या विद्युततारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक झाल्याची घटना परतूर तालुक्यात घडली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की आपल्या शेतातून जाणार्या विदयुत तारांपैकी काही तारा लोंबकळत असल्याची आणि त्यापासून पीक तसेच जनावरे  आणि मजुरांना धोका असल्याची तक्रार पुर्वीच शेतकर्यांनी केली होती. एप्रिल महिन्यामध्ये या शेतकर्यांनी परतूर येथील महावितरण कार्यालयाला या तारा  बाबतीत निवेदनही दिले होते,परंतु सहा महिने झाले तरी कुठलीच हालचाल महावितरणच्या अधिकार्यांच्या वतीने केल्या गेली नाही त्यामुळे शेवटी उभ्या  उसाच्या पीकला या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागली त्यामुळे मौजे रोहिना ब्रू शिवारातील दत्तात्रय पांडुरंग खोसे गट नंबर 215/16 मधील 80  आर,शेषेराव पांडुरंग खोसे,70 आर केशव पांडुरंग खोसे,70 आर,श्रीरंग पांडुरंग खोसे,80 आर,सुंदर पांडुरंग खोसे,60 आर या प्रमाणे या पाच शेतकर्यांचे  उस जळाले.