Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसने काळा आकाशदिवा लावून राज्य सरकारचा केला निषेध

बुलडाणा, दि. 19, ऑक्टोबर - एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी न्याय हक्काच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमुळे प्रवाशांचे होत असलेले हाल बघता राष्ट्रवादी विद्यार्थी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बसस्थानक समोर काळा आकाशकंदील लावून भाजप सरकारचा निषेध केला. आणि एस.टी कर्मचार्‍यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करून बस सेवा सुरळीत करा आणि प्रवाशांचे होणारे हाल तात्काळ थांबवा अशी मागणी आंदोलनात केली.
एस.टी बंद असल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे त्यातच प्रचंड गर्दी असल्याने खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून लूट करीत आहेत. त्यामुळे तात्काळ बससेवा सुरळीत करण्यासाठी सरकारने कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण करा व तो पर्यंत खाजगी वाहतूकदारकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवा.
यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने बसस्थानकासमोर  आकाशात काळा  आकाशदिवा लावून निषेध नोंदवित राष्ट्रवादी विध्यार्थी कॉग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अँड संदीप मेहेत्रे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष यासीन शेख, राष्ट्रवादी युवा नेते निलेश ठाकरे सर, विध्यार्थी शहर अध्यक्ष नितीन चौधरी, तालुका अध्यक्ष दीपक येखंडे, सतीश देशमुख, नितीन शेळके, संतोष बरडे, अभिजित राजे, दीपक राजे, खलील कुरेशी, रामेश्‍वर येखंडे, तानाजी भोपळे, विलास पर्‍हाड, शाम भागडे, शाहरुख काझी, हिवाळे, योगेश चौधरी, प्रदीप खरात, मनीष कावळे, सिद्धार्थ भालेराव, प्रमोद रंधावे, विशाल मेहेत्रे, वशीम शेख आदींनी तीव्र आंदोलन केले, यावेळी एस.टी.महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभाग घेतला.