Breaking News

शेतकरी-कामगारांचे प्रश्‍नांबाबत राज्य सरकार उदासीन-अविनाश आदिक

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - राज्यात सत्तेवर असलेले भाजप-सेनेचे सरकार हे केवळ घोषणाबाज सरकार असून शेतकरी-कामगारांचे प्रश्‍नाबाबद  उदासीन असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी केली.
नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे शेतकरी व साखर कामगार दिवाळी पाडवा भेटीच्यावेळी श्री.आदिक बोलत होते.साखर कामगार फेडरेशनचे  सरचिटणीस नितीन पवार,ज्ञानेश्‍वर कामगार संघटनेचे सेक्रेटरी जनार्दन कदम,उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, कार्याध्यक्ष सुखदेव फुलारी,कामगार संचालक  संभाजी माळवदे,मच्छीन्द्र साळुंके,हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब  जावळे,सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके,व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी  श्री.आदिक पुढे म्हणाले,राज्य सरकारने दिलेली ऐतिहासिक कर्जमाफी फसवी ठरत आहे.66 लाख शेतकरयांना मिळणारी कर्जमाफी आता केवळ 6 लाख  40 हजारांवर आलेली आहे.कोणताही प्रश्‍न घेऊन गेले तर मुख्यमंत्री फक्त हो म्हणतात करत काहीच नाही.शेत महामंडळाचे शेतकरी कामगार,एसटी  महामंडळाचे कामगार,साखर उद्योगातील कामगार व शेतकरी सर्वांचेच प्रश्‍न प्रलंबित आहेत.शेतमहामंडळाचे प्रश्‍न महसुल की कृषी नेमक्या कोणत्या खात्याकडे  आहेत हेच मंत्री,मुख्यमंत्र्यांना माहीत नाही.एसटी महामंडळ तोट्यात असल्याने बोनस, वेतनवाढ देता येत नाही असे सांगणारे राज्य सरकार 4 लाख कोटीने  तोट्यात असताना सरकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग कसा काय लागु केला.एसटी तोट्यातुन बाहेर काढण्यासाठी सरकारनेच ठोस पाऊल उचलले  पाहिजेत.ग्रामीण भागाचा विकास साधणारे सहकारी क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे.शेतकरी,साखर कारखानदरी व साखर कामगारांसह सर्वच क्षेत्रातील  कामगार अडचणीत आहेत.घुले, गडाख,राजळे यांना शेतकरी व कामगारांविषयी आत्मीयता आहे.शेतकरी,कामगारांचे हित जपणारे हे नेतृत्व असल्याने  ज्ञानेश्‍वर, मुळा,वृद्धेश्‍वर मधील कामगारांचे फार काही प्रश्‍न प्रलंबीत नाहीत.
  यावेळी पत्रकार नामदेव शिंदे,अशोकराव भूमकर,दत्तात्रय चोपडे,पांडुरंग विधाटे, अंकुश दाभाडे,सुरेश आरगडे,पंढरीनाथ पिसाळ,नानासाहेब बनकर,संपत  पिसाळ,अरुण उंडे,बाबासाहेब रोडगे, भास्कर कांबळे,बाळासाहेब जावळे,सतिष पिसाळ,अशोक पिसाळ आदी उपस्थित होते.