Breaking News

साईदास परिवार ट्रस्टच्यावतीने ‘एक करंजी मोलाची’

या उपक्रमांतर्गत स्नेहालय संस्थेस फराळ

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - आपण सर्वजण दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. प्रत्येकजण आपल्या घरात लाडू, करंजी, चिवडा व  इतर फराळाचे पदार्थ करत असतो, पण ही दिवाळी सर्वांच्याच घरी होत नाही. परिस्थितमुळे सण त्यांना माहित नसतो. यामध्ये अनाथ, मुकबधीर, अपंग,  अंध, वृद्ध आदि स्नेहालय, कुष्ठधाम आदि सामाजिक संस्थांमध्ये अशा व्यक्ती आहेत. त्यांना सणाचा आनंद घेता यावा, यासाठी साईदास परिवराच्यावतीने  दिवाळीत घरोघरी जावून फराळ गोळा करुन तो ज्यांच्याकडे दिवाळी साजरी होत नाही, फराळ मिळत नाही, अशा व्यक्तींना दिले जाते. यामुळे त्यांचीही  दिवाळी गोड होते, असे प्रतिपादन कैलास नवले यांनी केले. 
साईदास परिवार ट्रस्टच्यावतीने ‘एक करंजी मोलाची’ या उपक्रमांतर्गत स्नेहालय संस्थेस फराळ देण्यात आला. याप्रसंगी कैलास नवले, प्रकाश म्हस्के, मधू  जोशी, शिरुभाई कराळे, दत्ता डोळसे, नंदू गुरसाळे, दिलीप तावरे, निशिकांत शिंदे, ज्ञानेश्‍वर जाधव, विजय शिंदे, शंकर बोरुडे, भोपे गुरुजी आदि उपस्थित  होते.
याप्रसंगी प्रकाश म्हस्के म्हणाले, साईदास परिवाराच्यावतीने धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही मोठे योगदान देण्याचे काम करत आहोत. साईदास  परिवाराच्यावतीने यापूर्वी अंधांना पांढर्या अत्याधुनिक काठीचे विरतरण करण्यात आले, तसेच अन्नदान सारखे उपक्रमही राबविले जातात. दिवाळीत ‘एक  करंजी मोलाची’ उपक्रमांतर्गत दिवाळी फराळाचे अनाथांना वाटप करुन त्यांचीही दिवाळी आनंददायी करण्याचा प्रयत्न केला आहे.
साईदास परिवाराच्यावतीने ‘एक करंजी मोलाची’ उपक्रमांतर्गत शहरातील विविध सामाजिक संस्थांना गोळा केेलेल्या फराळाचे वाटप करण्यात आले. या  उपक्रमांचे या सेवाभावी संस्थांनी कौतुक करुन आभार मानले. या उपक्रमासाठी साईदास परिवाराचे सर्व साईभक्त आणि साईराम नगर येथील साईश्रद्धा  कॉलनी, बोल्हेगांव येथील साईभक्तांनी परिश्रम घेतले.