Breaking News

मुंबईत 2 कोटींच्या एमडीसह दोघे अटकेत

मुंबई, दि. 01, फेब्रुवारी - अंधेरी परिसरात कारवाई करून साडे 13 किलो एमडी जप्त केली असून याची किंमत 2 कोटी 68 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत कृष्णा चौधरी व मुकेश टकले या दोघांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 


दुबईतरील तस्कर कैलास राजपूतच्या सांगण्यावरून दोन जण अंमली पदार्थाची मुंबईत तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी पहाटे सापळा रचून कृष्णा व मुकेशला ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन किलो एमडी जप्त करण्यात आली. त्यानंतर कृष्णाच्या कांदिवलीतील घरात छापा टाकला असता 11 किलो 420 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.