Breaking News

पाथर्डीत वंचितांना दिवाळी फराळचे वाटप

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - दिवाळी हा सण पूर्ण देशात मोठा उत्सवात साजरा केला जातो परंतु हा आनंदाचा सण अनेकांना  पैशाअभावी किंवा  अनाथ असल्याने साजरा करता येत नाही..बारमाही या गावातून त्या गावात भटकणार्‍या  लोकांना दिवाळीचा फराळ भेट देऊन  समजाबद्दल सामाजिक  बांधिलकी येथील पाथर्डी शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन जोपासली आहे.
दिवाळीचा सण हा  खरा आनंद अशा निरागस चेहर्‍यावर आनंद फुलवायचा सण असतो.घरातल्या मुलांसाठी  कपडे आणि फटाके आपण दरवर्षीच घेत  असतो.पण गावोगावी बारमाही भटकत असणार्‍या या भटक्या वंचितांच्या वस्तीतल्या निरागस मुलांच्या चेहर्‍यावर आनंद खुलणार्‍या दिवाळीचा आनंद  अनुभवून ही दिवाळी माणूसपणाची दिवाळी म्हणून साजरी करायची असा निर्णय घेऊन शहरातील पाथर्डी नगरपालिकेचे नगरसेवक महेश बोरुडे,प्रा.हेमंत  सुपेकर,डॉ.योगेश वाकचौरे या तरुणांनी दिवाळीचा आनंद भटक्या वंचितांसोबत  साजरा करण्याचा संकल्प केला आणि शहरातील कोरडगाव रोडवरील  खोलेश्‍वर बँकेच्या शेजारी असणार्‍या मैदानावर डोंबार्‍याचा खेळ करून आपली उपजीविका भागविण्यासाठी आलेल्या कुटुंबातील नागरिकांना व त्यांच्या लहान  लहान मुलांना संबंधित तरुणांनी दिवाळीचा फराळ म्हणून विविध प्रकारच्या फराळाचे वाटप केले.यावेळी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,शिक्षक बँकेचे माजी  संचालक दिलीप बोरुडे,पत्रकार राजेंद्र भंडारी,अभिजित खंडागळे,शुभम सुपेकर,विवेक बोरुडे,गणेश शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना हेमंत सुपेकर  म्हणाले की,झारखंड मध्ये आधार कार्ड शिधापत्रिकेला जोडलेले नसल्यामुळे तेथील एका कुटुंबाला रेशन दुकानदाराकडून तांदूळ देण्यास नकार देण्यात  आला होता.त्यामुळे संबंधित कुटुंबातील अकरा वर्षाच्या मुलीला केवळ वेळेवर अन्न न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला असल्याची बातमी आपण दोन  दिवसांपूर्वी वाचली होती.तेव्हा गावातील  तरुणांशी या विषयावर चर्चा करून वंचित व गोरगरीब असणार्‍या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय  घेतला.लहान-लहान मुलांना दिवाळी फराळ वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून हीच खरी दिवाळी असल्याची अनुभूती आली.तसेच जर  समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी जर पुढाकार घेऊन अश्या प्रकारे वंचितासाठी हातभार लावला तर भारतात नक्कीच अश्या वंचित घटक सुद्धा  दिवाळीचा आनंद वाटेल.असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.