Breaking News

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा ॠसंघर्षनायक’ किताबाने होणार गौरव

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आंबेडकरी जनतेतर्फे ॠसंघर्षनायक’ या किताबाने गौरव क रण्यात येणार आहे. येत्या सोमवारी दुपारी 3 वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर सभागृहात हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ॠसाप्ताहिक स्टार महाराष्ट्र’च्या वतीने यावेळी समाजातील विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांचा श्री. आठवले यांच्या हस्ते ॠस्टार महाराष्ट्र अवॉर्ड 2017’ या पुरस्काराने  सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका श्रुती पाटील आणि साप्ताहिक स्टार महाराष्ट्रचे संपादक हेमंत रणपिसे यांनी दिली.