Breaking News

जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रतिबंध, दोषींना जलद शिक्षेतूनच बाल लैंगिक शोषण रोखता येईल - विजया रहाटकर

पुणे, दि. 26, ऑक्टोबर - लहान मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराविरोधात लढायचे असेल तर त्याविषयी जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रति दोषींना जलद शिक्षा या त्रिसूत्रीची  गरज आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सहकार्याने के ई एम हॉस्पिटल रिसर्च सें टर, पुणे, शारिटे बर्लिन, बायर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या ॠलैंगिक अत्याचाराविरोधात प्राथमिक प्रतिबंध’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमावेळी लैंगिक अत्याचार घडूच नये म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी, बर्लिन यांनी विकसित केलेल्या ’जपश्रळपश -ीीशीीाशपीं ढेेश्र’ चे रहाटकर यांच्या  हस्ते अनावरण करण्यात आले. लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षक वाटणार्‍या पण आपल्या हातून गुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीवर या माध्यमातून जर्मनीमध्ये  उपचार केले जातात. याचीच सुरुवात आजपासून भारतात होत आहे.
शोषण करणारा आरोपी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे मात्र अशा घटनांना आळा घातला तर आपण समाजात एका आरोपीचा आणि एका पिडीताचा जन्म थांबवू शकतो असेही  रहाटकर यांनी सांगितले.