Breaking News

अहमदनगरचे ग्रामजोशी वेदमूर्ती मधुकर मुळे गुरूजी यांचे निधन

अहमदनगर, दि. 26, ऑक्टोबर - वेदमूतीं मधुकर गोविंद मुळे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले . येथील अमरधाम स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  अहमदशहा बादशहा यांनी अहमदनगर शहर वसवतानर(जिल्हा नाशिक) येथील बालपाठक या ब्राम्हण कुटुंबास येथे बोलावून स्वतःच्या हाताचा ठसा असलेली चंदनाची सनद  ग्रामजोशी म्हणून बालपाठकांना बहाल केली.ग्रामजोशी हा बहुमान जपताना धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत शहरात नियोजित यजमानांकडे पूजा सांगण्याचे कार्य निष्ठेने  केलेल्या मुळे यांना वृध्दापकाळाने देवाज्ञा झाली..यावेळी ब्राम्हण समाजातील मान्यवर,पुरोहित व अन्य समाजबांधव उपस्थित होते.
त्यांच्या मागे पत्नी श्रीमती मालती,मुलगा चकोर मुळे,मंगल अनंत देशमुख,स्वाती मनोज भंडारे व मंजुषा विद्यानंद रसाळ या तीन मुली,सर्वश्री.पद्माकर गोविंद मुळे,भालचंद्र गोविंद मुळे  व सुभाष गोविंद मुळे हे तीन भाऊ आणि श्रीमती विजया शामराव कोटस्थाने व विद्या विनायक कुलकर्णी या दोन बहिणी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.रविवारी दिवाळीचे  मुहूर्त सांगण्यासाठीही ते शहरात फिरले होते.वेदमूतीं गजानन विष्णु मुळे या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर मुळे यांनी मंत्रशास्त्राचे अध्ययन केले.नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व काशी  येथील विव्दानांशी घनिष्ठ संबंध आल्याने पौरोहित्य करण्याचे शास्त्रोक्त ज्ञान संपादन करत मधुकर मुळे यांनी आजोबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अमरकोशाचे दोन कांड पाठ के ले.वेदमूतीं श्रीधरशास्त्री वारे यांनी मधुकर मुळे यांना नाशिकला नेऊन षोडश संस्कार,श्राध्दविधी यांची शास्त्रोक्त माहिती देत अमरकोशच्या तिसरे कांडचा पाठ करवून घेतला.नगरचे  वेदमूतीं नागोपंत धर्माधिकारी यांनी मधुकर मुळे यांना शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेच्या संहितेतील बावीस अध्याय शिकविले.उर्वरित अठरा अध्याय वेदमूतीं दत्तोपंत रेखी यांनी क रवून घेतले.पंढरपूर येथील वेदमूतीं नम्रशास्त्री (राहामआ्र सावदे)यांच्याकडे सव्वावर्षे राहून मधुकर मुळे यांनी रघुवंश,सिध्दांत कौमुदी या ग्रंथांचे अध्ययन केले. गेल्या सत्तर वर्षापर्यत  विवाह सोहळ्यात घटी पध्दत होती.त्यानुसार ते विवाहसंस्कार करत.संस्कृत,मराठी, हिंदी,मारवाडी व गुजराथी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.ज्योतिषशास्त्र,कर्मकांड,पुराण यामध्ये ते  निष्णात होते.अंकशास्त्र,हस्तशास्त्र,फलित,कुंडली व रमलशास्त्र या शास्त्रांमध्ये त्यांचा हातखंडा होता.पूजाविधी करताना ते हातात कधीही पोथी घेत नसत.नामस्मरण व पूजाविधीत ते  सतत मग्न असायचे.धोतर,नेहरूशर्ट आणि डोक्यावर बुट्याची काळी टोपी असा साधा भारतीय पेहराव त्यांचा असायचा.मंगलकार्यप्रसंगी ते पगडी परिधान करत.जीवनात अनेकवर्षे  त्यांनी गोसेवा केली.ते गायीची इतकी काळजी घेत की गाय कशामुळे आजारी आहे हे ते नेमकेपणाने ओळखून अचूक उपचारही करत.अंमळनेरकर महाराजांच्या गादीवरील पाच  महाराज त्यांनी पाहिले.सोनईच्या हरिहरानंद महाराजांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.जामखेडरोडवर सारोळा येथे असलेले माहुरच्या देवीचे मंदिर,निंबोडीचा खंडोबा आणि भिंगारच्या  पाटीलगल्लीतील मुंजोबा मंदिर येथे घरातील मंगलकार्यप्रसंगी दर्शनास जाण्याची घराण्याची परंपरा त्यांनी श्रध्देने जतन केली.