Breaking News

रुग्णांसाठी ऐच्छिक शुल्कात चार दिवसीय मेडिसीन फ्री कार्यशाळा

पुणे, दि. 03, ऑक्टोबर - मेडिसीन फ्री लाईफतर्फे चार दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही कार्यशाळा  होणार आहे. या कार्यशाळेत गरजू रुग्णांना ऐच्छिक शुल्क देऊन प्रवेश घेता येणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निरोगी जीवन कसे जगायचे, डॉक्टरांच्या  गोळ्या-औषधांशिवाय आजारांवर कसे उपचार करायचे याविषयी डॉ. प्रविण चोरडीया कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.मेडिसीन फ्री लाईफ ही कार्यशाळा प्रत्येक  महिन्यात दोन वेळा चार व सात दिवसांची घेतली जाते. या शिबिरात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात पण त्याच बरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देखील  येतात. ज्यामुळे पुन्हा आजार होण्याची शक्यता कमी असते. पित्त, अर्धशिशी, मायग्रेन, उच्च रक्तदाब, मधुमेह, त्वचेचे आजार, वंध्यत्व अशा विविध आजारांवर  उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात. त्याचबरोबर ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून निरोगी व तंदुरूस्त जीवन जगायचे आहे अशा व्यक्तींचाही सहभाग कार्यशाळेत वाढत  आहे. कार्यशाळेत व्यायाम, योगा, ध्यान, संतुलीत आहार याबाबत मार्गदर्शन केले जाते. ही कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहितीसाठी 020 - 24221026,  8275027576, 8857909097, 9545529978 या क्रमांकावर संपर्क साधावा.