Breaking News

साकीनाका परिसरातील आग नियंत्रणात; जीवितहानी नाही

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - साकीनाका परिसरात भीषण लाग लागली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे आणि सहयोगामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला  यश आले आहे. साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे ही आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्यापही समोर  आलेली नाही. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. खैराणी रोड हाजी सनाउल्ला कंपाऊंड येथील मैदानात अवैध धंदे चालवतात. कोणत्याही प्रकारची कारवाई होत  नाही. यावर कोणाचेही नियंत्रण नाही, असा आरोप नगरसेवक आणि नागरिकांनी केला आहे.