Breaking News

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नासधूस; एटीएम फोडले

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - राहुरी शहरात नगर - मनमाड राज्यमार्गावरील सतत वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोरील येवले कॉम्पलेक्समध्ये एका दुकानासमोर  बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे भुरट्या चोरट्यांनी फोडले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मध्यराञी स्टेट बँक ऑफ इंडीयाचे ए. टी एम. गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. यात अंदाजे  15 लाख 22 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली असून 4 लाख रुपयांच्या ए. टी. एम. मशिन नुकसान झाले आहे. या घटनेमुळे एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा  स्पष्ट झाले आहे.  
नगर-मनमाड राज्यालगत असलेल्या भर वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरीची ही घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरही भलेमोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेने बँक ांच्या ए. टी. एम. मशीन सुरक्षित नसल्याचे व त्या ठिकाणावर सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ भेट देवुन पाहणी  केली. यानंतर बँक अधिकारी व ए. टी. एम. मशिनचे देखभाल करणारी कंपनी यांना कळविले असता येथे संबंधित ईपीस मुंबई कंपनीचे सुपरवायझर यांनीही भेट दिली. यासंबंधी पो लिस ठाण्यात युगंधर धर्मराज कासार यांनी फिर्याद दाखल केली.