Breaking News

रक्ताला कोणताही जात धर्म नसतो - ज्ञानेश्‍वर फासे

अहमदनगर, दि. 16, ऑक्टोबर - रक्ताला कोणताही जात,धर्म नसतो.रक्तदान सारखे सामाजिक उपक्रम घेतल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही.माणुसकीच्या नात्याने युवकांनी  सामाजिक कार्य केल्यास बदल घडणार आहे.सामाजिक उत्तरदायित्वाने प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहन एस.बी.सी.संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर फासे यांनी केले.तसेच  युवकांनी डॉ.कलाम यांच्या जयंती दिनी घेतलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
भारतरत्न तथा माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भिंगार येथे एस.बी.सी.संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी फासे बोलत  होते.विद्यार्थी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण येलूलकर,उपाध्यक्ष प्रसाद टकले यांनी या शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी प्रमोद अष्टेकर,मच्छिंद्र लोखंडे,राष्ट्रवादी विद्यार्थी का ँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर,केडगाव शिवसेनेचे संग्राम कोतकर,अरुण दळवी,भारती आसलेकर,मृणाल कनोरे,प्रकाश मारवाडे,दिपक भागवत,दिलीप आस्मर,सोमनाथ  खाडे,सुरेश विधाते,मयुर ढाकणे,सुनिता उदबत्ते,सागर भागवत,दत्ता गुरसाळी,नंदकिशोर होगाडे,किशोर कटोरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रवीण येलूलकर म्हणाले की,स मितीच्या वतीने विशेष मागासवर्गीय समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देवून, विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.युवकांचे प्रेरणास्थान असणार्या अब्दुल कलाम  यांना अभिवादन करण्यासाठी रक्तदानाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी युवकांनी उत्सपुर्तपणे रक्तदान करुन डॉ.कलाम यांना अभिवादन केले. रक्तदान  शिबीरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपिढीचे या उपक्रमास सहकार्य लाभले.