एसटीच्या जादा गाड्या ओव्हरफ्लो ; दिवाळीमुळे बसस्थानकांस जत्रेचे स्वरूप
पुणे, दि. 16, ऑक्टोबर - दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या पुणे विभागातर्फे 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान आरक्षणासाठी 1,338 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सर्वच गाड्यांचे 100 टक्के आरक्षण झाले असून नियमित धावणार्या एसटीही प्रवाशांनी भरगच्च झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
दिवाळीसाठी शहरातून गावाकडे जाणार्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकात रविवारी अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. यावर्षी पुणे विभागाच्या वतीने 2 हजार 658 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 1338 एसटी गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध होत्या. उर्वरित 1 हजार 320 गाड्या या प्रवाशांना नियमित पद्धतीने उपलब्ध करण्यात असून त्या विविध मार्गावर धावत आहेत.