Breaking News

अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याप्रकरणी एकास कोठडी

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन शोषण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आनंद नरसिंग पवार (वय 28, रा. आरफळ, ता. सातारा) याला  अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यासाठी महसूल विभागातील एका जबाबदार अधिकार्‍याने संश यिताला सहकार्य केली असल्याची माहिती समोर येवू लागली आहे. 
सातारा शहर पोलीस ठाण्यात आनंद पवार याच्याविरुध्द अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आहे.  अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संशयिताचा शोध घेत होते. मात्र संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. संशयिताची माहिती  मिळताच पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. संशयिताने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने त्याच्याविरुध्द पोक्सो कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल केला आहे. आनंद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान, पो लिसांनी संशयितांकडे चौकशीला सुरुवात केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येवू लागली आहे. संशयित पवार याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर त्याला  अनेकांनी लपून राहण्यासाठी मदत केली आहे. महसूल विभागात उच्च पदावर कार्यरत असणार्‍या अधिकार्‍याचा यात समावेश असल्याची चर्चा आहे. या सर्व घटनेच्या तपासादरम्यान  संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.