Breaking News

खा. उदयनराजे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुईंज, दि. 13 (प्रतिनिधी) : आनेवाडी टोलनाक्यावर जमावबंदीचे आदेश असताना गुरुवार, दि. 5 रोजी जमाव जमावल्या प्रकरणी खा.उदयनराजे भोसले आणि सुमारे 200 ते  250 जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  
आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनात बदल होणार असल्याने अशोका स्थापत्यकडून हा टोलनाका मायक्रोलाइन इन्फ्रा कंपनीकडे देण्यात येणार होता. परंतू टोलनाक्यावर काम क रणार्‍या स्थानिक कामगारांना कमी करू नये, दिवाळी सणाला  टोल नाक्यावरील कामगारांना बोनस मिळावा हे मुद्दे उपस्थित करून गुरुवार, दि. 5 रोजी सायंकाळी टोलनाका  हस्तांतरणास खा. उदयनराजे भोसले यांनी विरोध दर्शविला व जमावबंदी आदेशाचे उल्लंंघन केले म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा झाला आहे. 
खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अशोक सावंत़, अजिंक्य मंगेश मोहिते, मुरलीधर भोसले, सुजित उर्फ गुन्या आवळे, राजू गोडसे, सनी मुरलीधर भोसले आणि अन्य अनोळखी  200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व सपोनि बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.