Breaking News

खामगावमध्ये महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

बुलडाणा, दि. 13, ऑक्टोबर - विविध प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्या, यासाठी काल महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने पुकरलेल्या बेमुद कामबंद  आंदोलनात येथील एसडीओ कार्यालय आणि तहसील विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी सहभाग घेवून काम बंद आंदोलन केले. 
महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा समितीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना मागण्यांचे निवेदन सादर केले असून त्यात नमुद आहे की, महसूल लिपिकाचे नाव बदलून त्याला महसूल  सहाय्यक ठेवावे, नायब तहसीलदारांचा ग्रेड 4300 वरुन 4800 करण्यात आलेला आहे. तो मंजूर करणे, अव्वल कारकून वर्ग 3 मधील त्रुट दूर करणे, शिपाई वर्गातून तलाठी वर्गात  संवर्ग करण्याचे शासनाने मान्य केले होते. त्याबाबत निर्णय पारित करणे, पुरवठा विभागातील पदे सरळ सेवेनुसार न भरणे, नायब तहसिलदरांचे सरळ सेवा भरतीचे प्रमाण 30 टक्के  वरून 20 टक्के करून पदोन्नतीतील पदांची भरती 80 टक्के करणे यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आंदेलनत नायब तहसीलदार बि. एस. किट, जी. बी. चव्हाण,  व्ही. एस. चव्हाण अव्वल कारकून कु. एस. डी. पवार, लिपीक कु . डी. रावणकर, आर. एल. गायकवाड, वि.भ. राजपुत, एजे. पोदार, यांचेसह अधिकारी आणि कर्मचारींचा सहभाग  होता.