Breaking News

वीजनिर्मितीसाठी शेतातील पाचरटाचा वापर

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - चालू गळीत हंगामात 11 लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट असून नवीन बॉयलर चालवून स्टॉपेज कमी करून ताजा व परिपक्व ऊस 24  तासाच्या आत गळीत करून ऊस गळीताबरोबरच दररोज 27 मेगावेट वीजनिर्मिती करण्याबाबत गेल्या 6 महिन्यापासून नियोजन करण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी बगॅस कमी  पडणार असल्याने शेतकर्‍यांचे शेतातील पाचरट बेलिंग करून आणून कारखान्यात जळणासाठी वापरण्याच्या पहिलाच प्रयोग या हंगामात केला जाणार आहे, असा निर्धार मुळा क ारखान्याचे तज्ञ संचालक व मार्गदर्शक माजी आ. शंकरराव गडाख यांनी बोलून दाखविला.
मुळा कारखान्याच्या गव्हाणीचे पूजन संचालिका अर्चना दरंदले व दादासाहेब दरंदले तसेच सुनीता शेळके व दादासाहेब शेळके यांचे हस्ते करण्यात आल्यानंतर आज दि 30 उसाची  पहिली मोळी गव्हाणीत टाकण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हे होते. यावेळी जेष्ठनेते यशवंतराव गडाख  उपस्थित होते.
प्रारंभी कै. राजीव राजळे व कै कुंडलिक जगताप यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. व्यवस्थापक शंकरराव पटारे यांनी गळीत हंगाम नियोजनाची माहिती देत सर्वाचे स्वागत केले.  माजी सभापती कारभारी जावळे व कृषी उत्पन्न बाजार समिती कडुबाळ कर्डीले यांची  यावेळी भाषणे झाली. अशोक जेम्स यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात  संस्थापक यंशवंतराव गडाख म्हणाले, चाळीस वर्षांचा मोठा कालखंड पार पडला आहे  बाराशे पन्नास मेट्रिक टन क्षमतेने चालू झालेला हा मुळा कारखाना पुढच्या वर्षी सात हजार मेटि ्रक टन करण्याचा शंकररावांचा प्रयत्न आहे. जुन्या लोकांनी विश्‍वासावर मला शेअर्स दिले.  त्याला पात्र राहून काम केले.  त्यामुळे आजचे हे सुख नवी पिढी पाहत आहे. उर्वरीत  आयुष्य समाजासाठी देणार असल्याचे साहित्यिक गडाख म्हणाले.