Breaking News

ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांचा संप

धुळे , दि. 17, ऑक्टोबर - सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी  कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
या संपात  मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी  प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.