Breaking News

एसटी महामंडळाचे आवाहन कर्मचार्‍यांनी धुडकावले, सर्व कर्मचारी संघटना संपावर ठाम

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा सज्जड इशारा  एसटी महामंडळाने दिला त्यावर हे आवाहन सर्व कर्मचारी संघटनांनी धुडकावून संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महामंडळ कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे  लक्ष लागले आहे. संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी आज सळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देणारे परिपत्रक  महामंडळाने जारी केले होते. त्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत सर्व कर्मचारी संघटनांनी संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.या परिपत्रकात म्हटले आहे की, कामगार  न्यायालयाने संपावर जाण्यास प्रतिबंध केला असल्याचे महामंडळाने सर्व कर्मचार्‍यांना वेळोवेळी सूचित केले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन मंडळाला लोकोपयोगी सेवा म्हणून  घोषित केले आहे. त्यामुळे संप केल्यास तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.औद्योगिक विवाद अधिनियम 1947 कलम 22 नुसार समेटाची कार्यवाही सुरु असताना क ोणत्याही कर्मचार्‍यास संपावर जात येत नाही. जो कर्मचारी संपामध्ये सहभागी होईल त्याच्यावर एक महिना तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते. तरी सर्व कर्मचार्‍यांनी  आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावे अन्यथा बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असा इशारा महामंडळाने दिला आहे. दरम्यान एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे त्रस्त  झालेल्या प्रवाशांसाठी महामंडळाने आगारातून खासगी बसची सुविधा उपलब्ध केली होती.सर्व कर्मचारी संघटनेच्या या भूमिकेमुळे एसटी महामंडळ काय पावले उचलते याकडे  सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.