Breaking News

एसटीच्या संपामुळे चाळीसगांव आगाराचे 7 लाखाचे नुकसान

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - पगारवाढीसाठी एस.टी. कर्मचारी संपावर गेल्याने गुरूवारी एस.टी.चा पुर्तां चक्का जाम झाला. चाळीसगांव आगारातील 400 कर्मचारी संपात सहभागी  झाल्याने आगाराच्या 80 बसेस उभ्या होत्या. एस.टी.च रस्त्यावर न धावल्याने प्रवास्यांचे मात्र मोठे हाल झाले.
आपल्या विविध मागण्यांसाठी एस.टी. महामंडळ कर्मचारयांच्या संघटनेकडून दि. 17 रोजी बेमुदत संप पुकारण्यात आला. या आंदोलनात कर्मचा-यांच्या विविध राजकीय, सामाजिक  संघटनानी समर्थन देत सहभागी झाले. चाळीसगांव आगारातुन हया आंदोलनात 400 कर्मचारी सहभागी झाल्याने आगाराच्या 80 बसेस जागेवरच उभ्या होत्या. त्यामुळे आगाराला  600 फेरया रदद कराव्या लागल्या. प्रवासी वाहतुक बंद असल्याने आगाराचे 7 लाखाचे नुकसान झाले. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही. तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार  नाही अशी माहिती संघटनेच्या पदाधिकारयाकडून देण्यात आली. आंदोलनास राष्ट्रवादी कॉग्रेस कडूनही पाठींबा देण्यात आला .
चाळीसगांव येथे काल सकाळपासूनच आंदोलनास सुरवात झाली. एक-एक करून सर्व बसेस आगारात लावण्यात आल्या. त्यानंतर सर्व कर्मचारयांनी एकत्र येत आंदोलनास सुरवात  केली. यावेळी इंटकचे अध्यक्ष भागवत चौधरी, सचिव शांताराम पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष कोमलसिंग राजपुत, रत्नराज सांळुखे आदीसह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित  होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एस.टी. कर्मचारयाच्या पाठीशी उभा आहे अशा पाठिंब्याचे पत्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक  राजीव देशमुख,पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,शहराध्यक्ष शाम देशमुख,नगरसेवक रामचंद्र जाधव,भगवान पाटील,दिपक पाटील,सुर्यकांत  ठाकूर,जगदीश चौधरी तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
प्रवास्याचे हाल
सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने त्याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. एस.टी. बंद असल्याने प्रवास्यांची गैरसाय झाली. बस स्थानकात प्रवास्यांची मोठी गर्दी झाली  होती. तालुक्यातील इतर ठिकाणाहुन शिक्षणासाठी ये-जा करणारया विदयार्थ्यांनाही मोठया त्रासाला सामोरे जावे लागले. बराच वेळ वाहतुक चालु होण्याची वाट बघत बसस्थानकात  तिष्ठत बसावे लागले. शेवटी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागला.
पाचोर्‍यातही बंद
पाचोर्‍यातही एस.टी. कर्मचा-यांनी संपाला 100 टक्के पाठींबा मिळाला. पाचोरा आगारात 65 बस द्वारे 375 फेर्‍या मारल्या जात असुन यात 117 वाहक, 138 चालक व 40 यांत्रिक  कामगार संपात सहभागी झाल्याने दिवसभरात सुमारे 5 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे, शहरातील रस्त्यावर अनेक प्रवाशांनी स्टेशन वरुन रिक्षा स्टॉप पर्यंत व बाहेरगावी जाण्यास  मोठी कसरत करावी लागली. ऐन दिवाळीच्या सणात बसस्थानकात शुकशूकाट होता.