दिपावलीनिमीत्त राजहंस दूध संघाचे 35.45 कोटी रु.बँकेत वर्ग
अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरविलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दूधावर संघामार्फत दूध उत्पादकांना दिपावलीनिमीत्त दुध खरेदी दर फरक,दूधाचे पेमेंट,दूध वाहतूक ठेकेदारांची अनामत व पेमेंट, कामगारांना पगार व बोनस इत्यादींचे एकूण 34.45 कोटी रु. बॅकेत वर्ग केले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.
यावेळी रणजित देशमुख म्हणाले कि, माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. दुग्धव्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी आणली आहे. तालुक्यात निकोप व स्वच्छ सहकाराचे जाळे आहे. सर्वसामान्य दुध उत्पादकांच्या समृद्धीसाठी संघ अविरतपणे काम करत असतांना ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरणही करण्यात येते. संघाने सहा लिटर दुधाची पँकिंग सुरु केली असून दूध, पनीर, चीज, लस्सी, तुप व इतर उपपदार्थांचे नवीन आकर्षक अशा पँकिंगमधून विक्री करण्यात येत आहे.
दिपावली सणानिमीत्त दूध उत्पादक, दूध वाहतूक ठेकेदार व कामगारांना भरीव रक्कम वाटप होत असल्यामुळे दूध उत्पादक, दूध वाहतूक ठेकेदार, कामगार व व्यापारी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुक्यात सहकारी संस्था स्थापण करण्याचे काम स्व. भाऊसाहेब थोरात यांनी केले. त्यांचे अथक प्रयत्नांमुळे सहकारी संस्थांची प्रगती झाली. दूध उत्पादक सभासदांचे साततत्याने हित जोपासतांना दूध उत्पादकांना फायद्याचे ठरतील असेच निर्णय माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर दूध संघाचे संचालक मंडळाने घेतले आहे.