Breaking News

आंबरे पाटलांचे शैक्षणिक योगदान गौरवास्पद :चन्ना

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - जे. डी. आंबरे यांचे अकोले तालुक्याच्या शैक्षणिक विकासातील योगदान निश्‍चितच गौरवास्पद आहे, त्यांना रोटरी जीवन गौरव पुरस्कार देऊन अकोले  रोटरी कलबने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल रो.व्यंकटेश चन्ना यांनी केले.
रोटरी क्लब अकोलेच्या वतिने  अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे.डी.आंबरे  पाटील यांना रोटरी जीवन गौरव पुरस्कार  रोटरीचे प्रांतपाल रो.व्यंकटेश चन्ना यांच्या हस्ते प्रदान  करण्यात आला. याप्रसंगी रोटरी च्या उपप्रांतपाल रो.डॅा.बिंदु शिरसाठ, रो.सौ.लता चन्ना,सौ. निर्मला आंबरे, रोटरीचे अध्यक्ष अमोल वैद्य, सचिव रो. सचिन आवारी आदी व्यासपीठावर  उपस्थित होते. येथील अकोले महाविद्यालयाच्या के बी दादा सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी  बोलताना रो. चन्ना म्हणाले कि, विविध व्यवसायातील लोकांना एकत्र आणुन समाजसेवा करण्याचे काम रोटरी क्लब करत असतो. माणसाने दुस-याला स्वभाव बदलावयाला  लावण्यापेक्षा स्वतः दुस-याचे स्वभावानुसार अ‍ॅडजेस्ट करायला शिकले तर निश्‍चित प्रगती होते. अवघ्या चार महिन्यापूर्वी स्थापन  झालेल्या अकोले रोटरी  क्लबचे कार्य प्रशंसनीय असल्याचे  ते म्हणाले. ऊन अतिशय चांगले व  आपल्या भागाची गरज ओळखुन काम अकोले रोटरी करत आहे. रोटरी क्लब चा पहिला जीवन गौरव पुरस्कार अतिशय योग्य व पाञ व्यक्तीला दिला  आहे ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देऊन अकोलेत विविध नविन शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या त्या श्री. आंबरे यांची निवड योग्य असल्याचे ते म्हणाले. रोटरीच्या  देशात व  आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणार्‍या कार्याची त्यांनी माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना जे.डी.आंबरे म्हणाले कि -   रोटरी क्लब अकोलेचा  पहिला जीवन गौरव पुरस्काराचा मानकरी ठरलो हे आपले भाग्य असुन हा पुरस्कार मला मिळाला तो माझा  व्यक्तीगत पुरस्कार नसून  अकोले  तालुका एज्युकेशनच्या अध्यक्षाचा व संस्थेचा पुरस्कार आहे. माजी मंञी मधुकरराव पिचड, आमदार वैभवराव पिचड व श्रेष्ठीनी माझ्यावर गेली दहा वर्षे  टाकलेल्या विश्वासामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला अकोले तालुका  एज्युकेशन संस्थेत  काम करण्याची संधी मिळाली व त्या संधीचे सोने करु शकलो. त्यामुळे आजच्या या पुरस्क ाराचे श्रेयही त्यांचेच असल्याचे कृतज्ञता पूर्वक त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व स्वागतात रो.अमोल वैद्य यांनी अकोले रोटरी क्लब च्या आज पर्यंतच्या कार्याचा अहवाल सादर केला तसेच भविष्यात क्लब मार्फत हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती  दिली. जे. डी. आंबरे यांच्या कार्याचा त्यांनी परिचय करून दिला. रोटरीचा पहिलाच जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करतांना आम्हाला  अतिशय आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
प्रांतपाल रो.चन्ना यांचा परिचय उप प्रांतपाल डॉ.बिंदू शिरसाठ यांनी करून दिला.मानपत्राचे वाचन रो.दीपक महाराज देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.संदेश कासार यांनी केले तर आभार स चिव सचिन आवारी यांनी मानले.
याप्रसंगी  राष्ट्रवादी कॅाग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, अकोले एज्युकेशन उपाध्यक्ष मधुकर सोनवणे, खजिनदार एस. पी. देशमुख,  सदस्य बाळासाहेब भोर, आरीफ तांबोळी, सौ. कल्पनाताई सुरपुरीया, अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. संजय ताकटे, परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीनाताई नवले, आय. टी.  आयचे प्राचार्य रो. विद्याचंद्र सातपुते,  माजी प्राचार्य शिरीष  देशपांंडे, डॉ.सुनिल शिंदे, डॉ. साहेबराव  वैद्य, मधुकरराव बिबवे, दशरथ आभाळे, संस्थेेेचे सर्व  विभाग प्रमुख, प्राध्यापक,  मुख्याध्यापक, शिक्षक यांचेसह रोटरीचे पदाधीकारी, संचालक मंंडळ, रोटरीचे सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.