Breaking News

अगस्तिकडून कर्मचार्‍यांना 13 टक्के बोनस : पिचड

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसास अगस्ती सहकारी साखर कारखाना अंतिम पेमेंट प्रतिटन 200 रुपयांप्रमाणे देणार असून कारखान्याच्या क र्मचार्‍यांना 13 टक्के बोनस व 20 दिवसांचा पगार सानुग्रह अनुदान म्हणून देणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगारांनाही तीन कोटी रुपये दिले जाणार आहे, असे सर्व एकूण अकरा क ोटी पंचवीस लाख रुपये संबंधितांच्या बँक खाती येत्या एक - दोन दिवसांत वर्ग करण्यात येईल अशी घोषणा अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी के ली.
अगस्ती साखर कारखान्याचा 24 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ काल पार पडला. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, कारखान्याचे उपाध्यक्षा  सीताराम पा. गायकर, गिरजाजी जाधव, जेष्ठ नेते दशरथ सावंत, जे.डी.आंबरे, यशवंतराव आभाळे, मीनानाथ पांडे आदींच्या हस्ते झाले. तत्पुर्वी कारखान्याचे संचालक अशोक आरोटे व  सिंधू आरोटे, अशोक देशमुख व लता देशमुख, संचालिका सुरेशा देशमुख व सुधाकर देशमुख, मनिषा येवले व सुभाष येवले कामगार प्रतिनिधी नामदेव आवारी व सुरेखा आवारी या  सर्वांच्या हस्ते बॉयलरचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ नेते लक्ष्मण शिंदे, परबतराव नाईकवाडी, राजेंद्र डावरे, सुनील दातीर, नगरसेविका निशिगंधा नाईकवाडी,  स्वाती शेणकर, अरुण रुपवते, सुधाकर देशमुख, कार्यकारी संचालक  भास्करराव घुले, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, प्रकाश नवले, रमेश देशमुख, एस. पी. देशमुख, कैलास शेळके, मच्छिंद्र धुमाळ, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजणे, महेश नवले,  रामनाथ वाकचौरे, संतु भरीतकर, रामनाथ शिंदे, ताईराम आंबरे, भरत देशमाने, किसन लहामगे आदी उपस्थित होते. यावेळी पिचड म्हणाले की, अगस्तीच्या कार्यक्षेत्रात यंदा सर्वाधिक ऊस  उभा आहे. त्यामुळे बाहेरुन ऊस आणून यावर्षी पाच लाख टनांपेक्षा अधिक गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. तालुक्यात गेल्या चाळीस वर्षात तीन मोठी धरणे, 14 लघु प्रकल्प, 115 पाझर  तलाव, 249 साठवण तलाव व सर्व नद्यांवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधून तालुक्याला मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध करुन दिले आहे. तालुक्यात ऊसासाठी 17 ते 18 हजार हेक्टर  क्षेत्र उपलब्ध असताना अवघ्या तीन हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. हे चित्र बदलण्यासाठी कारखाना सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्याची बेभरवशाची स्थिती पहाता कारखान्याने  इथेनॉल प्रकल्प उभारणी पुढे ढकलली असून साखर व इथेनॉलचे सतत कमी जास्त होणारे भाव पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. उपाध्यक्ष सीताराम पा. गायकर म्हणाले की,
सुमारे 15 कोटी रुपये खर्चून कारखान्याच्या मशिरींचे आधुनिकीकरण केल्याने बॅगसचे उत्पादन 150 टनांवरुन 300 टनांवर जाईल. बगॅसमध्ये जाणार्‍या साखरेचे प्रमाण कमी होऊन रिक व्हरीमध्ये वाढ होईल. आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने कारखाना दररोज 3500 मे. टन ऊसाचे गाळप करु शकेल. त्यामुळे कारखाना पुर्ण क्षमतेने चालून पाच लाख टन ऊसापेक्षा अधिक  उसाचे गाळप होउ शकेल. सलग दोन वर्ष असे गाळप झाले, तर कारखान्याने खर्च केलेले 15 कोटी रुपये वसूल होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. स्वागत मीनानाथ पांडे यांन केले  तर आभार अशोक आरोटे यांनी मानले.