Breaking News

फटाके न घेता उरलेले पैसे गरीब व गरजूंना देण्याचा संकल्प

। महाराष्ट्र बालक मंदिरमधील विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्तीची शपथ

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेच्या विद्यार्थीचा फटाक्यांवर बहिष्कार
दिवाळी म्हटली लहान मुलांकरीता फटाके हे प्रमुख आकर्षण असते पंरतु याला फाटा देत फटाक्याचे दुष्परिणाम पाहुन लालटाकी रोडवरील महारष्ट्र बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्याना फटाके  न उडवता फटाके मुक्तीची शपथ मुख्याध्यापक सुरेश शेवाळे यांनी दिली. निमित्त शासनाच्या प्रदुषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2017 चा मुख्याध्यापक सुरेश शेवाळे म्हणाले.
भारतीय पंरपरेतील सर्व सण, उत्सव यांचे निसगाशी अतुट नात आहे. सर्व सामान्य नागरिकांना निरोगी व प्रदुषण मुक्त वातावरणात जगण्यासाठी पर्यावरणाचा र्‍हास होणार  नाही  याकरीता  आम्ही गेली 3 वर्षे आम्ही हा संकल्प राबवत आहोत. यात विद्याथी त्यांच्या पालकाकडे फटाके आणु नका असा आग्रह धरतात  त्यामुळे वाचलेल्या पैसे आम्ही गोरगरीब, अनाथाना व  सेवाभावी संस्थाना देतो. दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश असल्याने फटाकामुक्त दिवाळी साजरी करू महाराष्ट बालक मंदिर शाळा ही सलग तीन वर्षे फटाके न  उडवण्याचा संकल्प करत असुन यात शिक्षकाबरोबरच सुमारे 900 विद्यार्थी यात सहभागी होतात फटाक्याचा पैशाचा उपयोग गोरगरिब, अनाथ, गरजुंना देण्यात येतो. शासनाच्या प्रदुषण मुक्त  दिवाळी संकल्प अभियान परीपत्रकाचे वाचन करण्यात आले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प
दिवाळीत लहान मुलांचे प्रमुख आकर्षण असलेल्या फटाक्यांना फाटा देत, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथ मिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी फटाके न वाजविता फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी फटाक्यांनी ध्वनी, वायू प्रदुषणाने  आरोग्य व पर्यावरणावर होणार्या दुष्परिणामाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसह पालकांना फटाक्यातून वाचलेल्या पैश्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा वाचनासाठी पुस्तके उपलब्ध  करुन देण्याचे आवाहन केले.
प्राचार्य अरविंद काकडे म्हणाले की, दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण आहे. समाजात प्रदुषणाचे अंधकार पसरले असून, सजीवसृष्टी धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. हा प्रदुषणाचा  अंधकार संपविण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपशिक्षिका उर्मिला साळुंके यांनी विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिपावली साजरी करण्याची शपथ दिली. तसेच  शासनाच्या प्रदुषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाचे वाचन करण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.