Breaking News

सारंगखेड्यात होणार देशातले पहिले घोडे संग्रहालय

नंदुरबार, दि. 18, ऑक्टोबर - नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे देशातील पहिलेवहिले घोडे संग्रहालय उभारले जात असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. दरवर्षी दत्तजयंती  नंतर डिसेंबरमध्ये येथे घोडे बाजार भरतो. त्यासाठी देशाच्या विविध राज्यातून व्यापारी येथे येतात व घोड्यांची खरेदीविक्री केली जाते. कोट्यावधी रूपयांची उलाढाल या काळात  होते.1964 पासून हा बाजार येथे दरवर्षी भरविला जातो. गतवर्षी सारंगखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोडेबाजार काळात या जागी घोडयांचे आगळेवगळे संग्रहालय बन विले जाईल अशी घोषणा केली होती.
त्यासाठी सरकारने 4.98 कोटी रूपये मदत दिली आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल वया गावाला वेगळी ओळख मिळेल असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाक डून सांगितले जात आहे.
सारंगखेडा येथे उभारण्यात येणार्या घोडेसंग्रहायाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. तापी नदीच्या काठी साडेसहा एकर जागेत घुमटाच्या आकाराचे हे संग्रहालय उभे राहणार  आहे.
त्यात देशभरातील विविध जातींच्या घोड्यांच्या प्रतिकृती, देशाच्या ऐतिहासिक वास्तू, त्यांचा इतिहास, आर्ट गॅलरी, प्रदर्शन, ऑडिओ व्हीडीओ रूम, रिसेप्शन कौंटर, भोजन स्टॉल,  प्रतिक्षागृह, दुकाने असतील. या संग्रहालयाची देखभाल ग्रामपंचायतीच्या अखत्यातरीत असेल व या संग्रहालयासाठी किती शुल्क आकारायचे याचा निर्णय ही ग्रामपंचायत घेणार आहे.