Breaking News

कोयाळीत विहिरीत पडून विवाहित महिलेचा मृत्यू

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - कोयाळी (ता,खेड) येथील विहिरीतील पाण्यात पडल्याने एका विवाहित महिलेचा मृत्यू झाला. मनीषा आबा टुले (वय 29, रा.कोयाळी, दिघे वस्ती) असे  मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची खबर संतोष बन्सी दिघे (वय 27, रा.कोयाळी) यांनी आळंदी पोलिसांत दिली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दिघे  शेतातील विहिरीवरील विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले असताना विहिरीतील पाणी पाहण्यास डोकावले असता पाण्यात पालथ्या स्थितीत महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ  पोलिसांना या बाबतची माहिती दिली. महिलेच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहे.