Breaking News

झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता तातडीने दुरुस्त करा

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या राज्यमार्ग 65 वर झगडे फाटा ते वडगाव पान या मार्गावर असंख्य लहान मोठे खड्डे पडले असून या  खड्यांना चुकवीत असतांना अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने  दुरुस्ती करावी अन्यथा  युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल अशा आशयाचे  निवेदन नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाला कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघातांची मालिकाच सुरु असून  याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या रस्त्याची आजवर करण्यात येणारी दुरुस्तीसुद्धा वरवरची मलमपट्टी करावी अशी दुरुस्ती केली गेली जाते . अवजड  वाहतूक कायमची सुरु असल्यामुळे हि वरवरची मलमपट्टी उखडली जावून खड्यांचे साम्राज्य तयार झाले असून  झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे.
मागील काही दिवसांपासून हा रस्ता खराब असल्यामुळे या मार्गाची वाहतूकही मंदावली आहे. त्याचा परिणाम या मार्गाच्या लगत असणा-या गावातील छोट्या-मोठ्या व्यावसायिक ांच्या व्यवसायावर झालाअसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी व या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम  विभागाचे सहाय्यक अभियंता (श्रेणी 2) एन. एस. कनोडे यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शिंदे, सुनील शिलेदार, सोपानराव आभाळे, सोपानराव  गुडघे, बाबुराव कोल्हे, वसंतराव आव्हाड, कचेश्‍वर डुबे, राधाकिसन कोल्हे, जगन्नाथ आढाव केशव जावळे, योगीराज देशमुख, कचरू कांडेकर, बाजीराव कांडेकर, संजय सोनवणे,  पोपट गुंड, अशोक खंडीझोड, कौसरभाई सय्यद, शांतीलाल पवार, सुभाष खंडीझोड, शिवाजी राहाणे, वामन राहाणे, चंद्रकांत झिंजुर्डे, देवेन रोहमारे, अशोक डूबे, कृष्णा शिलेदार,  ज्ञानदेव होन, सतीश दिघे, बाळासाहेब वाघ, एकनाथ औताडे, अनिल गुंजाळ, वसंतराव आव्हाड आदी उपस्थित होते.