Breaking News

पुण्यात तलाठी कार्यालयातील खुर्चीला हार-फुले वाहून आंदोलन

पुणे, दि. 26, ऑक्टोबर - पुणे शहरातील तलाठ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात छावा संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने विश्रांतवाडीतील तलाठी कार्यालयातील  खुर्चीला हार-फुले वाहून आंदोलन केले. तलाठी महासंघाने सोमवारपर्यंत हे आंदोलन मागे घेतले नाही तर छावा संघटना तलाठी कार्यालयांच्या विरोधात आंदोलनाला सुरूवात करून  शहरातील सर्वच तलाठी कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. शैक्षणिक प्रवेश, फी सवलत, शिष्यवृती किंवा महानगरपालिकेच्या विविध योजनेचा लाभ  घेण्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्न दाखला गरजेचे असते. परंतु सध्याच्या तलाठ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना व विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे छावा  संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.