Breaking News

अनधिकृत तिकिट दलालांविरुद्धच्या कारवाईत अडीच लाखांची तिकिटे जप्त

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - मध्य रेल्वेच्या 8 अनधिकृत तिकिट विक्रेते व दलालांविरुद्धच्या कारवाईत 2 लाख 58 हजार 415 रुपये किंमतीची 90 आरक्षित तिकिटे जप्त करण्यात  आली. वाणिज्य विभाग, रेल्वे सुरक्षा दल आणि दक्षता विभागामार्फत दलालखोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने संयुक्तदरित्या ही कारवाई करण्यात आली. 
या कारवाईत 2 अवैध दलाल सापडले. जे तिकिट रांगा टाळून जलद तिकिटे मिळवण्यायसाठी अवैध सॉफ्टवेअरचा वापर करत होते. 2 लॅपटॉप आणि 2 डेस्कटॉप संगणक जप्त क रण्यात आले. सर्व दलालांना पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली. या कारवाईअंतर्गत संगणकीय आरक्षण केंद्रात अवैधरित्या तिकिट खरेदी अथवा कोणतेही गैरप्रकार न  होण्यासाठी बारकाईने लक्ष दिले जात आहे. या अभियानामुळे ई-तिकिट अथवा आरक्षण प्रणालीमधून तिकिटे खरेदी करून प्रत्यक्षात प्रवाशांना चढ्या दराने अवैधरित्या तिकिट विक्री  करणा-या दलालांवर चाप बसला असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.