Breaking News

बीड मधील एका घरातून नव्वद हजाराचा गुटखा जप्त

बीड, दि. 14, ऑक्टोबर - बीड मधील पेठबीड भागातील फिरोज तांबोळी याच्या घरी काल रात्री अन्न सुरक्षा अधिकार्यांनी धाड टाकून 90 हजाराचा गुटखा जप्त केला.गुटका ठेवलेली खोलीही सील करण्यात आली आहे. अधिकारी जाधव यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, सचिन खोले, हे सहभागी झाले होते. या पुर्वी औरंगाबाद येथेही एका राहत्या घरी गुटका सापडला होता.