Breaking News

केदारनाथ पुनर्रचना व जीर्णोद्धार करण्यासाठी जेएसडब्लू’ समूह-उत्तराखंड सरकारमध्ये सामंजस्य करार

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - केदारनाथची पुनर्रचना व जीर्णोद्धार करण्यासाठी योगदान देण्यासाठी जेएसडब्लू समूहाने आज उत्तराखंड सरकारशी परस्पर  सामंजस्य करार (एमओयू) केला. पुनर्रचना व जीर्णोद्धार प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचा पाया रचला.
या करारानुसार, जेएसडब्लू समूहाने म्युझिअमबरोबरच आदी शंकराचार्य कुटिर, सरस्वती नदीवरील घाट यांची पुनर्रचना व जीर्णोद्धार, तसेच तीर्थ पुरोहित  यांची घरे व केदारपुरी येथील घरांशी संबंधित अन्य पायाभूत सुविधा यांच्या काही भागाची पुनर्रचना यामध्ये योगदान द्यायचे ठरवले आहे. केदारनाथ  हिमालयात, उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून अंदाजे 11,000 फूट उंचीवर वसले आहे. केदारनाथ हे चारधामपैकी एक आहे आणि  भारतातील एक पवित्र ठिकाण आहे.
जेएसडब्लू समूहाचे अध्यक्ष या कराराविषयी म्हणाले, केदारपुरीचा जीर्णोद्धार करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला भगवान शंकराच्या ऋणात राहण्याचा योग  मिळाला. भारतातील समृद्ध धार्मिक वारसा जतन करण्यासाठी जेएसडब्लू समूह प्रयत्नशील आहे. पुनर्रचनेच्या आमच्या प्रयत्नांमुळे स्थानिक पायाभूत  सुविधा सुधारण्यासाठी आणि स्थानिक तीर्थ पुरोहित व केदारनाथला भेट देणार्‍या प्रचंड भाविकांसाठी विविध सुविधा विकसित करण्यासाठी मदत होईल.
2013 मधील संकटामुळे नुकसान झालेल्या किंवा वाहून गेलेल्या केदारनाथमधील एकंदर सोयीसुविधा सुधारण्यासाठी या प्रकल्पांची पुनर्रचना व जीर्णोद्धार  यामुळे मदत होईल.
जेएसडब्लू समूहाविषयी : काही अब्ज डॉलरचा समूह असेलला जेएसडब्लू समूह ओ. पी. जिंदाल समूहाचा भाग आहे व त्याने भारताच्या प्रगतीमध्ये  महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतातील आघाडीच्या बिझनेस हाउसेसमध्ये समाविष्ट होणारा जेएसडब्लू नावीन्य व शाश्‍वतता घेऊन स्टील, ऊर्जा,  सिमेंट, पायाभूत सुविधा व पेंट्स यामध्ये कार्यरत असल्याने राष्ट्रनिर्मितीला मदत होत आहे. हा समूह आपल्या क्षमता, वैविध्यपूर्ण उत्पादने, अद्ययावत  तंत्रज्ञान, उत्तम अंमलबजावणी व शाश्‍वततेवर भर यांच्या मदतीने उत्कृष्ट काम करत आहे. अंदाजे 40,000 लोकांच्या मनुष्यबळाच्या मदतीने जेएसडब्लू  आपल्या क्षमतांच्या बळावर कार्यरत असून त्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने, अद्ययावत तंत्रज्ञान, उत्तम अंमलबजावणी व शाश्‍वततेवर भर यांचा समावेश आहे.