’मुक्त’ला एम.फिल, पीएच.डी. शिक्षणक्रम सुरु करण्यास ’युजीसी’ ची मान्यता
नाशिक, दि. 27, ऑक्टोबर - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास नियमित पूर्णवेळ/अर्धवेळ नियमित पद्धतीने एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधन शिक्षणक्रम सुरु क रण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) मान्यता दिली आहे. या संदर्भात युजीसीने नुकतेच विद्यापीठास पत्र पाठविले आहे.
युजीसीच्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांना संशोधनपर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधन शिक्षणक्रम पुढील शैक्ष णिक वर्षापासून सुरु करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केल्यानुसार एम.फिल. आणि पीएचडी शिक्षणक्रमांची संरचना आणि क ार्यपद्धती विद्यापीठास बंधनकारक असणार आहे. युजीसीच्या सन 2016 च्या निर्देशानुसार विद्यापीठास हे दोन्ही संशोधन शिक्षणक्रम सुरु करण्यास मान्यता दिली आहे.