Breaking News

महिला सुरक्षेच्या मुद्यावर रेल्वेच्या महाव्यस्थापकांना भेटणार - चित्रा वाघ

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - ऐन दिवाळीत नालासोपारा, विक्रोळी, कुर्ला, मुंबई या ठिकाणी महिलांवर हल्ले झाले. यामुळे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्त  पडसलगीकर यांची भेट घेतली असून उद्या संध्याकाळी 5 वाजता रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्‍नाचा पाठपुरावा करणार आहोत,  अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली.
नुकतीच कुर्ल्याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीस अधिकारी पावरा यांनी पीडितेला चुकीचे मार्गदर्शन केले आणि तक्रार न करण्याचा सल्ला दिला. खरे तर या प्रकरणी आरोपीला  कडक शासन होणे व ॠपॉस्को’ कायदा लागणे गरजेचे होते. पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे त्याला जामीन मंजूर आला. या प्रकरणी आम्ही आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आरोपीचा  जामीन रद्द करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस अधिकारी पावरा आणि कोपर्डे यांची बदली करण्यात आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हांडे  यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.