क्षेत्रीय कार्यालय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने स्वच्छता अभियान
बुलडाणा, दि. 03, ऑक्टोबर - भारतीय स्टेट बॅकेच्या व्यवस्थापनाकडून विविध सामाजीक उपक्रम नेहमीच राबविले जातात.2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमीत्ताने एक कदम स्वच्छता की ओर या अभियानाला प्रतिसाद देत स्टेट बँकेच्या बुलडाणा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यापरिसरात व क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात क्षेत्रीय प्रबंधक एस.के. कुळकर्णी, मुख्य व्यवस्थापक राजेश्वर पाटील, बुलडाणा स्टेट बँकेचे मुख्यव्यवस्थापक शिवनारायण कनोजीया यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी या स्वच्छता अभियात सहभाग घेतला. यात शैलेंद्र शर्मा, संजय पेटकर, राजेंद्र श्रीवास, अविनाश बोचरे, प्रसाद दामले, श्रीराम शिरसाट, दिलीप महाजन, राजेश गोरे, संजीव यादव, विष्णु बाहेकर, महेश कुळकर्णी, विजय रदाळ, सचिन सुरडकर, शांताराम मोहरिल, हिमांशु डोंगरे, धनश्री डोंगरे, अभिजीत अडसुळ, महेश पाटील, गजानन बाबर, गजानन कुळकर्णी, गजानन इंगळे, यांनी प्रत्यक्ष स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ मकानदार, डॉ कुटुंबे, डॉ भागवत भुसारी उपस्थित होते.