नागठाणे येथे दारूबंदीबाबत महिलांकडून ठराव
नागठाणे, दि. 3 (प्रतिनिधी) : दारूबंदीसाठी एकवटलेल्या रणरागिणींनी एकीच्या जोरावर रविवारी झालेल्या नागठाणे येथील ग्रामसभेत दारूबंदीचा एकमुखी ठराव संमत केला.
सातारा तालुक्यातील नागठाणे येथे 1 ऑक्टोबर रोजी दारूबंदीसाठी महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी 11 सप्टेंबर रोजी दारू दुकान स्थलांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने 18 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेत महिलांची ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेस महिलांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सरपंच विष्णू महादेव साळुंखे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत महिलांनी उपस्थिती नोंदविली.
ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांनी विषय पत्रिका वाचून दाखविली. दारूबंदीचा विषय निघताच महिलांनी आक्रमक होत दारूबंदीला तीव्र विरोध केला. गावातून दारूचा समूळ नाश करावा, दारू पूर्णता: बंद करावी तसेच गावात दारू पिणारी व्यक्ती सापडल्यास त्यास दंडात्मक कारवाई करावी. गावचे पालक या नात्याने शिक्षा करावी, असे वक्तव्य उपस्थित महिलांनी केले. ठरावाची नक्कल संबंधित कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जाईल. हा विषय लवकरात लवकर सोडविला जाईल, असे मत माजी सरपंच विष्णू साळुखे यांनी मांडले.