मेहकर येथील शिवशक्ती ट्रॅक्टरने केला राज्यात पहिल्यांदाच 100 ट्रॅक्टर विकण्याचा विक्रम
बुलडाणा, दि. 03, ऑक्टोबर - शिवशक्ती ट्रक्टर्सच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्यास आणि ट्रॅक्टर्स वितरण सोहळ्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. तर शिवशक्ती ट्रॅक्टर्स च्या वतीने विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर 100 ट्रॅक्टर्सचे वितरण करुन फार्मट्रेक अंतर्गत राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी एवढ्या विक्रमी ट्रॅक्टर्स चे वितरण झाले आहे हे विशेष!
स्थानिक कृषी वैभव लॉन येथे इस्कॉट्स लिमिटेड चे आरबीएम एस.पी.सिंघ, एसकॉट्स लिमिटेड चे आर एफ एम संदिप रात्रे व संजय शर्मा, ओपेश्वर रहले, यांचेसह न.पा चे माजी सभापती भास्करराव गारोळे, शिवशंकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन धोंडगे, रा.ना.पवार बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पवार, काटे कंस्ट्रक्शन चे अर्जुनराव काटे, कृषी अधिकारी सरोदे तथा आदींची उपस्थिती होती.
शिवशक्ती ट्रॅक्टर्स चे संचालक किशोर गारोळे यांनी यावेळी सर्वांचा फेटे घालून सत्कार केला. तर शेनुजी अग्रवाल, सिद्धेश्वर पवार, संजय शर्मा, एस.पी.सिंघ यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी वितरक किशोर गारोळे यांनीही विचार व्यक्त केले. ते म्हणाले कि ग्राहक शेतकरी बांधवांच्या सहकार्यामुळेच आपण राज्यात पहिल्या क्रमांकाची विक्री करु शकलो. त्यामुळे येत्या दिवाळीला शिवशक्ती ट्रॅक्टर्सच्या वतीने भव्य सुनिश्चित उपहार योजना कुपन द्वारे आयोजित केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे संचालन शेषराव काटकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गारोळे परिवारासह उद्धव पाटील कंकाळ, दशरथ चनखोरे, देविदास चनखोरे, विलास शिंदे, विजय बोडखे, अर्जन वायाळ, नितीन गारोळे, प्रोजेक्ट ऑफिसर फिरोज खान, हरिश शर्मा, शिवशक्ती ट्रॅक्टर्स सेल सर्विस टिम च्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.