Breaking News

सायबर गुन्हे थांबविण्यासाठी सर्वसामान्य जनतेत जनजागृतीची गरज

नाशिक, दि. 11, ऑक्टोबर -  शहरातील वाढते सायबर गुन्हे थांबवावे व याकरिता सर्वसामान्य जनतेत जनजागृती करावी असे निवेदन राष्ट ्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुकेश शेवाळे, शिवराज ओबेरॉय यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक  पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांना देण्यात आले.
अलीकडच्या काळात इंटरनेटवरच्या गुन्ह्यांच्या म्हणजेच सायबर गुन्हेगारी संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मोबाईलवर  इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप  माणसे या प्रकाराला सतत बळी पडतात.
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आश्‍चर्यात टाकले. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी  अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. नोटबंदी नंतर ऑनलाईन बँकिंग व्यवहाराला सरकार प्राधान्य देत असल्याने सर्व सामान्य जनतासुद्धा  याकडे वळत आहे. परंतु कॅशलेस व्यवहार करायचे कसे यात कुठली खबरदारी पाळायला हवी याची जनजागृती करण्यास सरकार व  सायबर सबंधित यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. देशात सायबर सिक्युरिटी व्यवस्था सुरक्षित नाही. त्यामुळे खात्यातील पैसे चोरीला  जाण्याची भीती कायम आहे.
सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोग करणार्या घटनांचे प्रमाण वाढले असून महाविद्यालयीन तरुणांमध्ये हा प्रकार अधिक आढळून येत आहे.  सायबर क्राइमचे जाळे वाढत असून तरुणींसह तरुणांनाही याचा फटका बसत आहे. फेसबुक, व्हॉटस्अँपच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला  याचे चांगलेच परिणाम भोगावे लागत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून तरुणींना याच्या दुष्प रिणामांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या फ्रेंडस् गृपच्याच एखाद्या मुलीचा गैरफायदा घेत, तिचे फेसबुकचे अकाउंट हॅक करीत बदनामी  करणे, अश्‍लील मेसेजेस करणे, अश्‍लील फोटोज् अपलोड करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. आजकाल अनोळखी व्यक्तींमध्ये सहज मैत्रीचे  नाते निर्माण होते. त्यानंतर मोबाइल नंबर दिला जातो, गृपमध्ये आपला फेसबुक आयडी, ई-मेल आयडी दिला जातो किंवा एखाद्या मैत्रिणीचा  तो मित्र असतो. तो त्या मुलीला त्रास देण्याच्या मार्गावर असतो. या माहितीचा गैरवापर करीत तो संबंधित तरुणीला त्रास देऊ लागतो, असे  अनेक प्रकार शहरात घडत आहेत. शहरात होणार्‍या सायबर गुन्हेविषयी जनतेत जनजागृती करणे आवश्यक असल्याने योग्य ते पाऊल  उचलावे. हेल्मेट जनजागृतीसाठी युवक राष्ट्रवादीने हेल्मेट वाटप करून शहरातील सिग्नलवर फलक लावण्यात आले होते तसेच याही वेळी राष्ट ्रवादी युवक काँग्रेस पक्ष जनजागृतीसाठी पुढाकार घेणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी नवीन नाश्षि मुकेश शेवाळे, नाशिकरोड अध्यक्ष शिवराज ओबेरॉय, यतीन पाटोळे, स्वप्नील वाघचौरे, अक्षय विभूते, अंकित  तरटे, प्रदीप मोरे, प्रविण सांळुखे, तुषार आहेर, निखील खैरनार, रणजीत मोरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.