जायकवाडीतून आजही पाण्याचा विसर्ग
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोमवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाचे दहा दरवाजे अर्ध्या फूटाने उघडून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यानंतर परत आज पाण्याची आवक वाढल्याने दुसरे आठ दरवाजे उघडण्यात आले. पाण्याची आवक वाढत असून त्या प्रमाणे विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली असून गोदावरी पात्रा नजिकच्या गावांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे.