Breaking News

मोबाईल प द्वारे मिळणार आता तातडीची वैद्यकीय सेवा

सांगली, दि. 11, ऑक्टोबर - गरजू व अत्यवस्थ रूग्णांना तातडीची मदत मिळावी म्हणून सांगली महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर  मोबाईल प तयार करण्यात ये, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी दिली.
या मेडिकल पबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विजयकुमार काळम- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस  सांगली जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, राष्ट्रीय सूचना केंद्राचे अधिकारी के. मारियादास, आयएमएचे अध्यक्ष बी. एम. पाटील,  सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनायक शेटे व सॉफ्टवेअर डेव्हलपर सतीश सासणे यांच्यासह वैद्यकीय,  औषध व संगणक क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्तीचा जीव अनमोल आहे. अनेक व्यक्ती विविध आजारांनी त्रस्त असतात. अपघातानंतर जखमीचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक  क्षण महत्त्वाचा असतो. अशा क्षणी वेळेत उपचार मिळाले, तरच अत्यवस्थ व्यक्तीचा जीव वाचू शकतो. नेमकी हीच भावना समोर ठेवून हे  मोबाईल मेडिकल ऍप तयार करण्यात येत आहे. या ऍपमुळे अत्यवस्थ रूग्णाच्या गरजेला कमी वेळेत वैद्यकीय मदत मिळणार आहे. ऍलोप ॅथी शाखेतील विविध क्षेत्रातील तज्ञ व त्यांच्या माध्यमातून मिळणार्या वैद्यकीय सुविधांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
हे मोबाईल मेडिकल ऍप आठवड्याच्या अखेरीस सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. या  मोबाईल मेडिकल ऍपच्या माध्यमातून ऍलोपॅथी शाखेतील विशेष सेवा पुरविणार्या संस्था (हॉस्पिटल्स) व त्यांच्यावतीने दिल्या जाणार्या  वैद्यकीय सेवा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची नावे, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, देण्यात येणार्या सुविधा, ब्लड बँक, रूग्णवाहिका, औषध विक्रेते,  सोनोग्राङ्गी, क्ष- किरण, सिटी स्कॅन, एमआरआय अशा सुविधा देणारी रोगनिदान चिकित्सा केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब व महात्मा ङ्गुले जनआरोग्य  योजना यासारख्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती, पत्ता व दूरध्वनी क्रमांक यांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार असल्याचेही  विजयकुमार काळम- पाटील यांनी सांगितले.